Top News

Has your smartphone hacked? Identify this dangerous symptoms and save your data today
Samira Vishwas | July 4, 2025 7:24 AM CST

सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. हॅकर्स कधीकधी बनावट लिंक्स पाठवून लोकांना लक्ष्य करतात तर कधीकधी बनावट आप्सद्वारे लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवतात. हे हॅकर्स अश्या लिंक्स पाठवतात ज्यावर फक्त एकदा क्लीक करून तुमचे डिव्हाईस हॅक केले जाऊ शकते किंवा बॅकग्राउंडमध्ये कोणताही मालवेअर स्थापित केला जाऊ शकतो. डिव्हाईस हॅक झाल्यानंतर, फोनमध्ये अनेक प्रकारच्या दिसू लागतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. चला जाणून घेऊया मोबाईल हॅक झाल्यानंतर काय बदल होतात.

Sony आणि JBL ची उडणार झोप! गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट, लाँच झाले Nothing हे नवे हेडफोन्स; इतकी आहे किंमत

स्वतःहून चालू आणि बंद

जर तुमचा फोन स्वतःहून चालू आणि बंद होत असेल तर सावधगिरी बाळगा. तुमचे डिव्हाइस हॅक झाल्याचे हे पहिले लक्षण आहे. खरं तर, अनेक वेळा हॅकर्स तुमचे डिव्हाइस दुसऱ्या बाजूने नियंत्रित करत असतात, ज्यामुळे तुम्हाला फोन स्वतःहून चालू आणि बंद होत असल्याचे किंवा इतर काही क्रियाकलाप करताना दिसू शकते.

बॅटरी लवकर संपणे

जर तुमच्या फोनची बॅटरी खूप लवकर संपत असेल, तर ते काही मालवेअरमुळे असू शकते. खरं तर, मालवेअर अनेकदा बॅकग्राउंडमध्ये हॅकर्सना डेटा पाठवत राहतो, ज्यामुळे बॅटरी खूप लवकर संपते. अशा परिस्थितीत, तुम्ही ताबडतोब फोन सेटिंग्जमध्ये जाऊन फोनची बॅटरी कुठे सर्वात जास्त वापरली जात आहे ते तपासले पाहिजे.

वारंवार येणारे कॉल आणि मेसेजेस

असेही दिसून आले आहे की फोन हॅक झाल्यानंतर अनेक वेळा डिव्हाइसवर मोठ्या संख्येने कॉल आणि मेसेजेस येऊ लागतात. हे मेसेज खरे वाटू शकतात पण ते फक्त तुम्हाला अडकवण्यासाठी असतात. तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

आता प्रश्न असा आहे की, जर अशी चिन्हे दिसली तर तुम्ही प्रथम काय करावे?

तर सर्वप्रथम, तुम्ही अजिबात घाबरू नका आणि फोन हार्ड रिसेट करा. यामुळे ते सर्व मालवेअर डिलीट होतील. तथापि, फोन रिसेट करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या वैयक्तिक डेटाचा बॅकअप घेतला पाहिजे.

Redmi Note 14 Pro सीरीजचे नवे व्हेरिअंट्स लाँच, आकर्षक रंगासह भारतात केली एंट्री; वाचा स्पेसिफिकेशन्स


READ NEXT
Cancel OK